Nagpur News | बाबा जुमदेवजी जयंतीनिमित्त विविध चित्ररथांसह शोभायात्रा; हजारो सेवकांचा सहभाग

परमात्मा एक सेवक मंडळाचे आयोजन
Baba Jumdevji Jayanti
बाबा जुमदेवजी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त विविध चित्ररथांसह शोभायात्रा काढण्यात आलीPudhari
Published on
Updated on

Baba Jumdevji Jayanti

नागपूर: मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ गट क्र. १० हुडकेश्वर बूथ यांच्यावतीने शुक्रवारी पिपळा येथून विविध चित्ररथांसह शोभायात्रा काढण्यात आली. यात हजारो सेवक सहभागी झाले होते. शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज तसेच आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या बाबा जुमदेव यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर  गोविंदराव सोनवाने, रामाजी भोयर यांच्या मार्गदर्शनात व कवडू जुमडे, लहानु नान्हे, रामभाऊ डहाके, तुषार भुयार, भारत बावणे, श्रीकांत सोनवाने यांच्या नेतृत्वात गुरूवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी पिपळा  ते वर्धमाननगर मानव मंदिर अशी मानव धर्माची शोभायात्रा काढण्यात आली. महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. 

Baba Jumdevji Jayanti
Nagpur Snake News | अंध विद्यालयात ५ फूट लांबीचा नाग आढळल्याने खळबळ, विद्यार्थ्यांमध्ये भीती

पिपळा येथून सुरू झालेली शोभायात्रा म्हाळगीनगर, सुभेदार लेआऊट, दत्तात्रयनगर, भांडे प्लॉट चौक, नंदनवन, टेलिफोन एक्सचेंज चौक असे मार्गभ्रमण करून वर्धमाननगर येथील मानव मंदिरात पोहोचली. बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त नागपूरसह विदर्भातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रा वर्धमान नगर येथून काढण्यात आलेल्या मानव मंदिर शोभायात्रेत सहभागी झाल्या.  सायंकाळी पिपळा येथे हजारो सेवकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news