खरात याच्याकडे कोणते आमदार जात होते, हे समोर येऊ द्या'; अनिल देशमुखांची मागणी

Anil Deshmukh Statement on kharat case | सरकारने निष्पक्षपणे चौकशी करून कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले
Anil Deshmukh Statement
Anil Deshmukh (Pudhari Photo)
Published on
Updated on

नागपूर : कुणाचे फोटो अनेकांसोबत असू शकतात. अनेक पक्षांचे नेते अशोक खरात यांच्याकडे जात होते. कोणत्या पक्षाचे किती आमदार खरात यांच्याकडे जात होते, हे सर्व समोर येणे गरजेचे आहे. SIT मार्फत चौकशी सुरू आहे आणि ती सखोल झाली पाहिजे. जे कोणी खरात यांच्याकडे गेले असतील, त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

अशोक खरात यांच्याकडे राजकीय नेते कसे बळी पडत होते, हेही जनतेसमोर आले पाहिजे. सरकारमधील अनेक नेत्यांची नावे पुढे आली आहेत. थातूरमातूर कारवाई करून चालणार नाही. अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

ऑपरेशन टायगर

या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सत्ताधारी पक्षातील कोणते आमदार यात सहभागी आहेत, हे समोर आले पाहिजे. कोणत्याही नेत्याला किंवा आमदाराला वाचवू नये. सरकारने निष्पक्षपणे चौकशी करून कठोर कारवाई केली पाहिजे यावर देशमुख यांनी भर दिला.

चांदिवाल आयोगाचा अहवाल का दडवला, मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, मी राज्याचा गृहमंत्री असताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गैरकारभार केला. त्यांच्यावर अनेक आरोप होते. त्यामुळे मी त्यांना निलंबित केले. त्यानंतर परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप केला. या संदर्भात चौकशी व्हावी, अशी 6मी राज्य सरकारला विनंती केली होती. त्यानुसार राज्य सरकारने हायकोर्टाचे न्यायमूर्ती चांदिवल साहेब यांची नियुक्ती करून चौकशी करण्याचे आदेश दिले.११ महिने चौकशी करून त्यांनी 1400 पानी अहवाल चार वर्षांपूर्वी सरकारला सुपूर्द केला. मात्र, हा अहवाल चार वर्षांपासून सरकारकडे असूनही तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. हा अहवाल तातडीने जाहीर करावा, जेणेकरून जनतेला सत्य समजेल याकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले.

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दहा पत्रे लिहिली तरीही राज्य शासन हा अहवाल सार्वजनिक करण्यास तयार 5नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेसमोर हा अहवाल का सादर करत नाहीत, याबाबतही राज्य शासन काहीही बोलण्यास तयार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र बाबतीत

सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही असे स्पष्ट केले. आमदार सुनील शेळके ,अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख सुनील तटकरे आणि त्यांच्या पक्षातील काही आमदारांनी केलेली वक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. आमच्या पक्षात याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही या विषयावर शांत आहोत. आमचा पक्ष संघटनात्मकदृष्ट्या कसा मजबूत होईल, यावरच आमचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news