Ajit Pawar Asthi Visarjan | अजित पवार यांच्या अस्थी आज येणार, उद्या अंभोरा येथे करणार विसर्जन

श्रीक्षेत्र अंभोरा येथे पवित्र संगमावर वैदिक मंत्रोच्चारात व शास्त्रोक्त पद्धतीने अस्थी विसर्जन करण्यात येईल
Ajit Pawar death
स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अस्थिकलश
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ लोकनेते अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थिकलश आज सोमवारी (दि. 2) रात्री नागपूर येथे येणार आहेत. उद्या मंगळवारी (दि. 3 फेब्रुवारी) शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी अस्थी दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर दुपारी अंभोरा येथे अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे.

मंगळवारी (दि. 3 ) सकाळी ९ वाजेपासून सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांना दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, द्वारकामाई हॉटेल जवळ, म्हाडा कॉम्प्लेक्स रोड, गणेश पेठ येथे अस्थिकलश उपलब्ध राहील. उद्या दुपारी २ वाजता पक्ष कार्यालयापासून अस्थी विसर्जन यात्रेला सुरुवात होईल. श्रीक्षेत्र अंभोरा येथे पवित्र संगमावर वैदिक मंत्रोच्चारात व शास्त्रोक्त पद्धतीने अस्थी विसर्जन करण्यात येईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news