काँग्रेसच्या 'त्या' आमदारांवर कारवाई होणार : विजय वडेट्टीवार

विधान परिषदेमधील मते फोडणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार
Vijay Wadettiwar News
काँग्रेसच्या त्या आमदारांवर कारवाई होणार : विजय वडेट्टीवार Pudhari File Photo

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मते फुटल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर हे आमदार कोण, हे आमच्या लक्षात आले असून संबंधितांवर कारवाई अटळ आहे. याविषयीचा अहवाल हायकमांडकडे गेला असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी (दि.14) माध्यमांशी बोलताना दिली.

Vijay Wadettiwar News
MLC polls | विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांचा अर्ज दाखल

गेले अनेक महिने काँग्रेसच्या यादीत कागदोपत्री असलेले हे आमदार मनाने दुसऱ्या पक्षाची ओढ असल्याचे कळते. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार असतील असेही बोलले जाते. दुसरीकडे या पार्श्वभूमीवर लवकरच काँग्रेसमधून या आमदारांचे निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे बोलले जाते. मागील विधान परिषद निवडणुकीतच या आमदारांनी पक्षाशी बेईमानी केली मात्र कारवाई झाली नाही. यावेळी हे आमदार कोण, याचा शोध घेण्यासाठी यावेळी आम्ही नियोजनपूर्वक काम केल्याने त्यांचा शोध लागला आहे. आता लवकरच या सर्व संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. आधीच कारवाई झाली असती तर ही वेळ आलीच नसती असेही वडेट्टीवार म्हणाले. या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या विधान परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आहे.

Vijay Wadettiwar News
राष्ट्रपती निवडणूक : गोव्यात क्रॉस वोटींग; ४ विरोधी आमदार फुटले

मागील वेळी काँग्रेस हायकमांडने दिलेले उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांच्या विरोधात मतदान केल्याने त्यांचा पराभव झाला. हे सात आमदार यावेळी देखील महाविकास आघाडीच्या विरोधात गेले आहेत. यामुळे आता तरी तातडीने या सर्वांवर ठोस कारवाई पक्षाने करावी अशी मागणी, या निमित्ताने काँग्रेस आमदारांकडून पुढे आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तर चर्चेतून या संदर्भातील आपला अहवाल हाय कमांडकडे सोपविल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news