Bhavantar Yojana Maharashtra | 'भावांतर योजना' महाराष्ट्रात लागू करा: आम आदमी पार्टी

देशाच्या एकूण कापूस उत्पादनामध्ये विदर्भाचा वाटा सुमारे 33 टक्के
Aam Aadmi Party Nagpur
तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आगामी हंगामापासून ‘भावांतर योजना’ लागू करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली Pudhari
Published on
Updated on

Aam Aadmi Party Nagpur

नागपूर : आम आदमी पार्टी, नागपूर शहरतर्फे महाराष्ट्रात ‘भावांतर योजना’ लागू करण्याच्या मागणीसाठी नागपूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. देशाच्या एकूण कापूस उत्पादनामध्ये विदर्भाचा वाटा सुमारे 33 टक्के इतका मोठा आहे. तरीसुद्धा येथील कापूस उत्पादक शेतकरी सतत आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

या पार्श्वभूमीवर, तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आगामी हंगामापासून ‘भावांतर योजना’ लागू करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘भावांतर योजना’ तातडीने लागू करावी, या प्रमुख मागणीसह मुख्यमंत्री, वित्तमंत्री, कृषीमंत्री व पणनमंत्री यांना नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

Aam Aadmi Party Nagpur
Nagpur Heatwave | उपराजधानीत उन्हाचा तडाखा, उष्माघाताचा 15वा बळी! पारा गेला 43 अंशावर

हे निवेदन नागपूर शहर संघटन मंत्री रोशन डोंगरे, नागपूर शहर सह संघटन मंत्री गिरीश तितरमारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळेस प्रामुख्याने प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, जॉय बांगडकर, सौरभ गोतमारे शाहिद अन्वर, हरीश वळेकर, किशन निमजे, अलका पोपटकर, शैलेश रामटेककर, संदीप साखरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news