वरोऱ्याजवळ अपघातात रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दोन जखमी

दोन रेल्वे कर्मचारी गंभीर जखमी
Road Accident in Nagpur
नागपूर येथील अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमीPudhari File Photo

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याजवळ शुक्रवारी (दि.29) एक भीषण अपघात झाला. या अपघातात नागपुरातील एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले आहेत. एसईसीआर रेल्वेतील सेक्शन इंजिनियर आणि वाहन चालक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

शुक्रवारी (दि.28) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे बिलासपूरच्या महाव्यवस्थापक यांच्या चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाची पाहणी दौरा झाला. चांदाफोर्ट येथून नागपूरला परतत असताना हा अपघात घडला. यावेळी चार चाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ते वरोरा ते जांब दरम्यान टेंभुर्डा परिसरात एका ट्रेलरला आदळले.

Road Accident in Nagpur
वेळापूर येथील अपघातात तरुणाचा मृत्यू

महाव्यवस्थापक नागपुरात येत असल्याने सारेच धावपळीत होते. ट्रेन चालक व्यंकटराव बाबू हे यामध्ये जखमी झाले. याबरोबरच वाहनात बसलेले वाणिज्य विभागातील सुरेंद्र सिंग देखील गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा एक कर्मचारी बबलू डोगर जखमी झाला आहे. घटनास्थळावरील लोकांच्या मदतीने जखमी असलेले व्यंकटराव बाबू आणि बबलू डोगर यांना नागपुरातील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news