श्रीरामनवमी शोभायात्रेने नागपूर राममय; ८४ चित्ररथ शोभायात्रेत सहभागी

श्रीरामनवमी शोभायात्रेने नागपूर राममय; ८४ चित्ररथ शोभायात्रेत सहभागी
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरची ऐतिहासिक, गौरवशाली सांस्कृतिक परंपरा असलेल्या श्री पोद्दारेश्वर श्रीराम मंदिराच्या भव्य शोभायात्रेने नागपूर राममय झाल्याचे पहायला मिळाले. यंदाचे 58वे वर्ष आहे. बुधवारी निघालेल्या या शोभायात्रेत 84 चित्ररथ सहभागी झाले. दुपारी 4 वाजता मंदिर परिसरातून श्रीराम रथाचे पूजन सरसंघचालक मोहन भागवत, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. विकास ठाकरे, रामकृष्ण पोद्दार, पुनित पोद्दार आदींच्या उपस्थितीत हाताने रामरथ ओढत या शोभायात्रेचा शुभारंभ झाला.

1967 साली श्रीराम मंदिराच्या या शोभायात्रेला अतिशय साधेपणाने भजन मंडळींच्या सहकार्यातून सुरूवात झाली आज या शोभायात्रेला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले असून ही शहराच्या विविध भागात फिरून ही शोभायात्रा मंदिरात परतण्यास मध्यरात्र होते. ठिकठिकाणी यावेळी जल्लोषात स्वागत झाले, महाप्रसाद, सरबत,ताक वितरण सुरू होते.यावेळी प्रवीण गुंड, किशोर पाटील, रामकृष्ण पोद्दार, सुरेश अग्रवाल, विपीन पोद्दार, संतोष काबरा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच पश्चिम नागपूर रामनगर राम मंदिर तसेच बेलीशॉप मोतीबाग येथील शिव मंदिरातूनही उत्तर नागपूरचो श्री राम शोभायात्रा निघाली, विविध आकर्षक चित्ररथांनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी श्री रामललाच्या अयोध्येतील मूर्तीची प्रतिकृती आरूढ असलेल्या मुख्य रथाची निर्मिती धनराज पेटकर परिवारातर्फे कलात्मक पद्धतीने केली आहे. या रथाची विद्युत सजावट श्याम बुर्रा, इंदोर यांनी केली आहे.

आकर्षक नृत्य

शोभायात्रेच्या प्रारंभी 108 मंगल कलशधारी कुमारीका सहभागी झाल्या.त्यानंतर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध राज्यातील पारंपरिक लोकनृत्याचे सादरीकरण पथकांनी केले. गांधीबाग रोलर स्केटिंग क्लबतर्फे शैलेंद्र पाराशर यांच्या नेतृत्वात स्केटिंग नृत्य, लोटस रोलर स्केटिंग क्लबतर्फे कमलेश पांडे यांच्या नेतृत्वात स्केटिंग नृत्य चांदूराम दरबार सेवा मंडळ जरीपटकाच्या सौजन्याने सनमुखदास सेतिया याच्या नेतृत्वात पारंपरिक छेज नृत्य. लोटस कल्चरल व नटराज क्रीडा मंडळ-आदिवासी कोरकू चिटकोरा. सार्वजनिक खदान दुर्गा माता मंदिर-गरबा नृत्य. युवक लांसर्स क्रीडा मंडळ-लोकनृत्य यासोबतच विविध पौराणिक देखावे,नयनरम्य चित्ररथ आकर्षणाचे केंद्र होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news