नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कॉलेजमधील स्नेहसंमेलन आटोपून जात असताना ट्रकखाली आल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.रितिका रामचंद्र निनावे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती वायसीसी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक ब्रांच इंजिनिअर फोर्थ इयरला शिकत होती. रितिका महाविद्यालयातील गॅदरिंग आटोपून घरी परत जात असताना वायसीसी कॉलेज हॉस्टेलच्या गेट समोर मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे रितिकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी लगेच मोठी गर्दी झाली.ट्रकचालक पसार झाला.