बिल गेट्स पडले नागपुरी डॉली चहाच्या प्रेमात | पुढारी

बिल गेट्स पडले नागपुरी डॉली चहाच्या प्रेमात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध उद्योगपती, गेट फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी नागपूरच्या प्रसिद्ध डॉली चहावाला यांची भेट घेतली. अफलातून स्टायलिश चहाचा आस्वाद घेतला. बिल गेट्स हे भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्या दरम्यानच ‘डॉलीच्या चाय ‘ची बिल गेट यांचेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे नागपूरच्या IIM सोबतही बिल गेट्स फाउंडेशन काम करीत आहे. हे चित्रीकरण हैदराबादला झाल्याचे समजते.

नागपुरातील सिव्हिल लाईन्सस्थित जुन्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनसमोर जुन्या सचिवालयाच्या संरक्षक भिंतीला लागून डॉलीकडे दिवसभर अनेक लहान मोठ्या लोकांची चाय पे चर्चा सुरू असते. चहा झाला की खास स्टाईलमध्ये डॉलीची सुटे पैसे परत करण्यासोबतच हातावर विलायचो ठेवण्याचा हजरबपणा बघितला की बडे बडे त्याच्या ,त्याच्या स्टाइलिश चहाच्या प्रेमात पडतात.

Back to top button