ठाकरे गटाला धक्का, विदर्भ संपर्कप्रमुख शिल्पा बोडखे यांचा राजीनामा | पुढारी

ठाकरे गटाला धक्का, विदर्भ संपर्कप्रमुख शिल्पा बोडखे यांचा राजीनामा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला असून नागपुरातील ठाकरे गटाच्या विदर्भ संपर्कप्रमुख शिल्पा बोडखे यांनी राजीनामा दिला आहे. ठाकरे गटात दलाली करणारेच लोक पक्ष चालवतात, असा शिल्पा बोडखे यांनी आरोप केला आहे. उपनेत्या विशाखा राऊत आणि नाशिक संपर्कप्रमुख रंजना नेवाळकर यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. उद्या ठाकरे गटाचे पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचे रामटेकमध्ये शिबिर आणि आज शिल्पा बोडखे यांचा राजीनामा याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षात उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर मनमानी कारभार करत आहेत त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे, अशा शब्दात टीका करत शिल्पा बोडखे यांनी हा राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाचे नेते दलाली करीत असल्याचा थेट आरोप केल्याने त्या इतर पक्षात जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button