नागपूर : अमितेश कुमार यांना पोलीस आयुक्त कार्यालयात निरोप | पुढारी

नागपूर : अमितेश कुमार यांना पोलीस आयुक्त कार्यालयात निरोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याने नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात आज त्यांना निरोप देण्यात आला. बॅण्डधून, पुष्पवृष्टी असे सारे भारावलेले वातावरण होते. साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांना मुदतवाढ मिळाली. अमितेश कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले की नागपुरातील मागील साडे तीन वर्षाचा कार्यकाळ खूप चांगला गेला. यामध्ये सगळे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, यांच्या सहभागाने जनतेची आमच्याकडून असणारी अपेक्षा व आम्हाला दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यात यश मिळाले, सामान्य जनतेचा पूर्णतः विश्वास पोलीस विभागाला लाभला. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक आव्हाने येत असतात. सगळ्यांच्या सहकार्यामुळे चांगले काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

Back to top button