नागपूर : दोन मगरींच्या झुंजीत जखमी झालेल्या मगरीवर शस्त्रक्रिया | पुढारी

नागपूर : दोन मगरींच्या झुंजीत जखमी झालेल्या मगरीवर शस्त्रक्रिया

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराज बाग प्राणी संग्रहालयातील दोन मगरींच्या झुंजीमध्ये मादी मगर गंभीर जखमी झाली. तिच्या मागच्या डाव्या पायालाही मोठी जखम झाली होती. अखेर या मगरीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

महाराज बाग प्राणी संग्रहालयातील दोन मगरींच्या झुंजीमध्ये मादी मगर गंभीर जखमी झाली. जखमी मगरीवर उपचार करण्याकरिता तिला पकडण्याकरिता नारायणा विद्यालय, वर्धा रोड येथील मोहन जोशी सर यांनी मोलाचे योगदान दिले. या मगरीची शस्त्रक्रिया करण्याकरिता सर्जन डॉ. रोहिणी टेंभुर्णे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) नागपूर यांना पाचारण करण्यात आले होते. महाराज बाग प्राणीसंग्रहालय प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांच्या मार्गदर्शनात महाराजबाग प्राणी संग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत मोटघरे व डॉक्टर रोहिणी टेंभुर्णे यांनी जखमी मगरीस १० टाके लावले व आवश्यक उपचार केले. सदर शस्त्रक्रिया करण्याकरिता, ही जखमी मगर पकडण्यासाठी महाराज बाग प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Back to top button