अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातलेल्या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट | पुढारी

अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातलेल्या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात भंडाऱ्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पुढे आल्याने वातावरण तापले. दरम्यान, गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत मागणी करणाऱ्या या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर भेट घेतली. लवकरच मंत्रालयात भेटून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे हेलिपॅडवर आले असता त्यांनी या आंदोलनकर्त्याला बोलवून घेत त्याचे म्हणणे समजून घेतले.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांची मागणी मांडण्यात आली. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी आणि प्रसार माध्यम प्रतिनिधींनी हा गोंधळ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घातल्याचे वृत्त प्रसारित केले मात्र हे वृत्त वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Back to top button