1953 साली विदर्भ जेव्हा महाराष्ट्रात सामील झाला, त्यावेळी नागपूर करार करण्यात आला होता. त्यात विदर्भाच्या विकासाचा महत्वाचा मुद्दा होता. लोकसंख्येच्या तुलनेत 23 टक्के सर्वच क्षेत्रात आम्हाला वाटा दिला जाणार होता मात्र, विदर्भावर सातत्याने सिंचन, रस्ते, प्रकल्प याबाबत नियमित अन्याय होऊन वेगळ्या विदर्भाचा वाद वाढत गेला. तीन राज्ये दिली पण विदर्भ राज्य डावलले गेले. विदर्भात वीज निर्माण होते. मात्र, सगळ्यात महाग वीज विदर्भाला मिळते, रोजगार नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहे, भकास विदर्भ झाला आहे त्यामुळे आम्हाला आता महाराष्ट्रात राहायचं नाही, आम्हाला आमचे हक्काचे वेगळं विदर्भ राज्य द्या अशी मागणी यावेळी पूर्व विदर्भ प्रमुख अरुण केदार यांनी माध्यमांशी बोलताना केली. व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर गुरुवार नागपूर कराराची होळी करण्यात आली.