१८ व्या दिवशी ओबीसी आंदोलनाला विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या १८ दिवसांपासून ओबीसींच्या हक्कासाठी संविधान चौकात साखळी उपोषणा सुरू आहे. आज या उपोषणाला राज्यभरातून विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. यावेळी सर्वश्री गणेश नाखले, महेंद्र उईके, गेमराज गोमासे, शरद वानखेडे, दौलत शास्त्री, माया घोरपडे, पल्लवी मेश्राम,केशव शास्त्री, त्रिलोकचंद व्यवहारे, परमेश्वर राऊत, प्रा. रमेश पिसे, कल्पना मानकर, सुधाकर तायवाडे, उदय देशमुख, हेमंत गावंडे, डॉ अरुण वराडे, अविनाश घागरे हे आज उपोषणाला बसले आहेत.आज धुळे नगर पालिकेचे प्रथम महापौर भगवानजी करंकाळ,नांदुरा येथील ओबीसी महासघांचे, उपाध्यक्ष विजय डवंगे, सुरज बेलसरे, अमरावती येथील राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे, प्रकाश साबळे, शहराध्यक्ष अनिल ठाकरे साहेब,राहुल तायडे, यांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, चंद्रशेखर पांडे,प्रवीण जोध,अजीज पटेल अमरावती,राजेश ठाकरे, अरुण वराडे, पांडुरंग कापसे,आणि स्थानिक स्तरावर आंदोलन करण्याचे मनसुबे व्यक्त केले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाला ऑर्गनायझेशन फॉर राईटस ऑफ ट्रायबल (ऑफ्रोट) संघटनेच्या जाहीर पाठिंबा आज देण्यात आला.