नागपूर : टेकडी गणपती मंदिराचा उपक्रम; निर्माल्यापासून तयार होतेय धूपकांडी | पुढारी

नागपूर : टेकडी गणपती मंदिराचा उपक्रम; निर्माल्यापासून तयार होतेय धूपकांडी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मंदिरात भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेनं अर्पण केलेल्या हार आणि फुलांचे नेमकं काय होतं असेल, ते निर्माल्य कचऱ्यात फेकली तर जात नसेल ना, हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात घर करून असतो. नागपूर येथील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात येणाऱ्या काही भक्तांनी सुद्धा हा प्रश्न मंदिराच्या विश्वस्तांना विचारला. यावर मंदिर विश्वस्तांनी एक उपाय शोधला. तो म्हणजे मंदिरात भक्तांनी गणपतीला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून धूपकांडी तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे 25 किलो धूपकांडी रोज तयार केल्या जातात. महत्वाचे म्हणजे आपणच देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध, धूप स्वरूपात आपल्या घरातील देव्हाऱ्यात दरवळणार आहे, हे समजल्यानंतर भक्त देखील मोठ्या प्रमाणात या धूपकांड्या विकत घेत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे 5 महिलांना तर रोजगार मिळाला. शिवाय रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न देखील मार्गी लागला अशी माहिती श्रीराम कुलकर्णी, सचिव मंदिर ट्रस्ट यांनी दिली.

Back to top button