'अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ' मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार...! नितीन गडकरी यांचा विश्वास

Nitin Gadkari | 7 ते 9 फेब्रुवारी दरम्‍यान 'खासदार औद्योगिक महोत्सव' 
Nitin Gadkari
'अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ' मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार ! ; नितीन गडकरी यांचा विश्वासfile photo
Published on
Updated on

नागपूर : विदर्भाच्या विकासासाठी किमान 50 हजार कोटींचे सामंजस्य करार  एडवांटेज विदर्भमध्ये होतील असा विश्वास केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केली. नागपूर एव्हिएशन आणि लॉजिस्टिक हब व्हावे यासाठी प्रयत्न असून, गडचिरोलीचा पोलाद प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होणार असल्याचे सांगितले. दाओस येथे झालेल्या सामंजस्य करारापैकी विदर्भात नेमके किती कोटींचे उद्योग आलेत, या विषयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः देतील असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.   

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) द्वारे 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कॅम्पस ग्राउंड येथे 'अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५: खासदार औद्योगिक महोत्सव'चे आयोजन करण्‍यात आले आहे. पत्र परिषदेत याविषयीची माहिती देण्यात आली. गडकरी म्‍हणाले, आपली प्राथमिकता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, दृष्टीने मागासलेला गडचिरोली जिल्हा असून आगामी पाच वर्षात गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा ठरेल हे स्वप्न आता पूर्ण होण्याकडे वाटचाल करत आहे. 

यावेळी खासदार श्याम बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती, बैद्यनाथचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेंद्र काकडे, आयआयएम  नागपूरचे संचालक भीमराया मैत्री,विजय शिरसाठ,  हिमा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गडकरी पुढे म्हणाले की, नागपूरला आपल्याला लॉजिस्टिक कॅपिटल बनवायचे आहे. अजनी,मुख्य स्थानकाचा विकास रेल्वे करणार, असून त्यासाठी राज्य सरकार आणि एनएचएआयतर्फे देऊ करण्यात आलेला निधी आता सिंदी ड्रायपोर्टसाठी वापरला जाणारा आहे. एसईझेड,मिहानमध्ये तीन वर्षात तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. मोठ्या प्रमाणात उद्योग येत असून मिहानचे विस्तारीकरण करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. मदर डेअरीच्या 670 कोटींच्या निर्यातक्षम दुग्धजन्य पदार्थांच्या प्रकल्पाचे देखील काम सुरू होत असल्याचे सांगितले. विदर्भातील तरुणांमध्ये क्षमता मोठी असून त्यांना कुशल मनुष्यबळाच्या दृष्टीने प्रशिक्षण आणि संधी मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.  विदर्भातील लोकप्रतिनिधी, उद्योग, औद्योगिक संस्‍था व संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्‍हावे व विदर्भाच्‍या विकासात हातभार लावावा, असे आवाहन यावेळी नितीन गडकरी यांनी केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुंबईतील थाई कॉन्सुल-जनरल डोनावित पूलसावत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र सरकारचे आयटी मंत्री आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण) आणि खाणकाम राज्यमंत्री पंकज भोयर, भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे, लॉयड्स स्टील अँड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. 

तसेच, युनिकॉर्नचे संस्थापक, ज्यात बोटचे सह-संस्थापक आणि सीएमओ अमन गुप्ता, नोब्रोकर डॉट कॉमचे संस्थापक अखिल गुप्ता, प्रिस्टिन केअरचे सह-संस्थापक वैभव कपूर, पॉलिसीबाजारचे अध्यक्ष आणि सीईओ सर्ववीर सिंग आणि अपनाचे सीईओ निर्मित पारीख हे स्टार्ट अप सेक्टर सत्रांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

 औद्योगिक प्रदर्शनात विविध प्रकारचे 300 स्‍टॉल्‍स असतील. १०० सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी राखीव असतील. इतर स्टॉलमध्ये संरक्षण सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सेबी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, जीएसटी विभाग, पोस्ट विभाग, सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम), शैक्षणिक संस्था यासारख्या सरकारी विभागांकडून विविध क्षेत्रातील उत्पादन श्रेणी, यंत्रसामग्री आणि सेवा प्रदर्शित केल्या जातील. 

भंडारा येथील ऑर्डिनन्‍स फॅक्टरीमध्‍ये झालेल्‍या स्‍फोटातील मृतकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. एआयडीचे अध्यक्ष सचिव डॉ. विजय शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. एआयडीचे  उपाध्यक्ष गिरधारी मंत्री आणि प्रणव शर्मा; कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी यांच्यासह कार्यकारी समिती सदस्य प्रशांत उगेमुगे, राजेश रोकडे, रवींद्र बोरटकर, महेंद्र क्षीरसागर, निखिल गडकरी, विनोद तांबी, महेश साधवानी, संजय गुप्ता, अविनाश घुशे यावेळी उपस्‍थ‍ित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news