नागपुरातील 14 उड्डाणपूल वाहतुकीसाठी केले बंद

Nagpur flyovers closed: मकर संक्रांतीत दुर्घटना नको म्हणून पोलिसांकडुन खबरदारी
Flyovers closed in Nagpur
उड्डाणपूलावर ठिकठिकाणी तैनात असणारे पोलिस.pudhari photo
Published on
Updated on

नागपूर : मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरात,गच्चीवर, मैदानात तसेच गल्लीबोळात पतंगबाजांची धूम आणि ओ काट.. ओ पार...चा आवाज मंगळवारी जोरात आहे. दुर्घटना नको म्हणून शहरातील आदिवासी गोवारी, छत्रपती ते विमानतळ, दिघोरी, मानकापूर, पारडी असे महत्वाचे 14 उड्डाणपूल खबरदारीचा उपाय म्हणून शहर पोलिसांनी बंद ठेवले आहेत. प्रत्येक ठिकाणी वाहतूक व शहर पोलीस तैनात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली.

दरम्यान, दुसरीकडे कालपासून अनेक चौकात जनजागृतीसाठी दुचाकी वाहनांवर रिंग लावले गेले जेणेकरून मांजा गळ्याला नव्हे तर या रिंगला अडकतो. मकरसंक्रांत पूर्वसंध्येला नागपूर शहर पोलिसांनी सुमारे 18 लाख रुपयांचा नायलॉन मांजा नष्ट केला. नायलॉन मांजाच्या हजारो चकऱ्यावर नागपूर शहर पोलिसांनी बुलडोजर फिरवला. नागपुरात 14 जानेवारी ते 26 जानेवारी गणराज्यदिनाच्या पर्यंत पतंगबाजी जोरात असते. पतंगाचा पाठलाग करताना अनेकजण थेट रेल्वे ट्रॅकवर धावतात, आपला जीवही धोक्यात घालतात. गेली काही वर्षे नायलॉन मांजाचा वाढता वापर पक्षी आणि मानवांसाठी जीवघेणा ठरत आहे. मकर संक्रांतीच्या या काळात अनेकांचा गळा, नाक कापला जातो. अनेकजण गंभीर जखमी होतात. पक्षांचा हकनाक जीव जातो.

यासंदर्भात जनजागृतीसाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनानी मोर्चेही काढले. नायलॉन मंजाचा वापर करू नका असे आवाहन केले. महापालिकेने मध्यंतरी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला मात्र असे असूनही पतंगबाजाकडून या जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात प्रमाणात सुरूच आहे. बाजारात छुप्या पद्धतीने चढ्या दराने त्याची विक्री करणारे देखील अनेक महाभाग आहेत. याविरोधात नागपूर पोलिसांनी देखील आता कंबर कसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news