नागपूर: गेटवे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या बोट दुर्घटनेत ही घटना घडली. त्यावेळी या बोट मध्ये 110 प्रवासी होते. 96 प्रवासी सुरक्षित असून 13 जणांचा मृत्यू झाला. यात नौदलाचे तीन तर दहा नागरिक आहेत अशी माहिती नौदलाच्या वतीने व्हाईस ऍडमिरल संजय जगजीत सिंग यांनी दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेत सांगितले.
आजच्या कामकाजात यासंदर्भात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. याबाबतीत ते निवेदन करीत होते. मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये वर्तकांच्या वारसांना दिले जाणार आहेत. गंभीर तीन जखमी मध्ये नौदलाचे कर्मचारी आहेत तर एक आठ महिन्यांची गरोदर महिला तर तीन वर्षाची मुलगी असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
नौदलाचा स्पीड बोट चालक व इतर जबाबदार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चौकशी सुरू असेल. 11 क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध कार्य दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.