नागपूर विद्यापीठ : १२० दिवस उलटूनही हिवाळी परीक्षांचे निकाल नाहीत; ओबीसी विद्यार्थी महासंघाचे तीव्र आंदोलन

नागपूर विद्यापीठ :  १२० दिवस उलटूनही हिवाळी परीक्षांचे निकाल नाहीत; ओबीसी विद्यार्थी महासंघाचे तीव्र आंदोलन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पुढील महिन्यात उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू करण्याची तयारी आहे. मात्र हिवाळी सत्रातील अनेक परीक्षांना 120 दिवसांपेक्षाही अधिकचा काळ लोटला असतानाही अद्याप निकाल मात्र जाहीर करण्यात आले नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे याविरोधात आज धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू संजय दुधे यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

आज राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाद्व्यारे नागपूर विद्यार्थ्यांचे विद्यापीठाच्या प्रशासन विरोधात तीव्र नारे देण्यात आले. नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी बी.ए, बी.कॉम, बी.एससी, एम.कॉम., एम.ए. परीक्षेचा निकाल १२० दिवस उलटून सुद्धा लावण्यात आला नाही. नागपूर विद्यापीठाने एमकेसीएलला विद्यार्थ्याचा डाटा व संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम दिले होते. परंतु, एमकेसीएलसोबत असणारा करार रद्द झाल्यामुळे त्यांच्याकडे असलेला विद्यार्थ्यांचा डाटा विद्यापीठाला द्यायला तयार नाही आहे. विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचा डाटा नसल्यामुळे सर्व घोळ होत असल्याची चर्चा आहे. विद्यापिठाचा शून्य नियोजन असल्याचा कारभार परीक्षा विभागाकडे विद्यापिठाचे लक्ष नाही. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाला पोहोचवली नाही, त्यामुळे निकालांना वेळ होत असल्याचे प्र- कुलगुरू संजय दुधे यांनी सांगितले.

120 दिवस लोटूनही निकाल लागत नसल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहे. तसेच विद्यापीठाचे वेळापत्रकसुद्धा बिघडते आहे. पुढील 7 दिवसांत विद्यार्थ्यांचे निकाल न लागल्यास राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ तीव्र आंदोलन व बेमुदत उपोषण करेल असा इशारा देण्यात आला. शहर अध्यक्ष विनोद हजारे व जिल्हाध्यक्ष निलेश कोढे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात रूपम झाडे, राहुल निमजे, निखील धुर्वे, विभोर बेलेकर, वैभव मांडवे, हर्षित मौर्य, गजानन शाहू, शिवानी विश्वकर्मा, गीता विश्वकर्मा, इशा चौधरी, सेजल शेंडे, ख़ुशी दुरुगकर, वैष्णवी कोरडे, मनस्वी सहारे, हिताक्षी इंगेवार आदींचा समावेश होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news