Railway ticket : रेल्वे तिकिटांचा गोरखधंदा, २३ लाखांची तिकिटे जप्त

Railway ticket : रेल्वे तिकिटांचा गोरखधंदा, २३ लाखांची तिकिटे जप्त

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची सुट्टी, लग्नसराईचे दिवस लक्षात घेता रेल्वे प्रवाशांकडून चढ्या दराने तिकिट विक्री करणाऱ्या एका दलालास नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सुमारे ८३ लाख रुपयांच्या ऑनलाइन तिकिट विक्रीचा व्यवहार उघडकीस आला आहे.

प्रवीण झाडे असे या ४३ वर्षीय दलालाचे नाव असून तो प्रोफेसर कॉलनी हनुमान नगर येथील रहिवासी आहे. आरपीएफने या कारवाईत दोन लॅपटॉप एक मोबाईल प्रिंटर जप्त केले असून यावेळी चौकशीत एक विशेष सॉफ्टवेअर पोलिसांच्या हाती लागले. ज्या माध्यमातून एका क्लिकवर अनेक तात्काळ, सामान्य श्रेणीतील तिकीट बुक केली जात होती.हे सॉफ्टवेअर पाहून पोलीस देखील बुचकळ्यात पडले. डीएसएसी आशुतोष पांडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आर एल मीना आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. अलीकडेच आर पी एफने विमानतळावरील रेल्वे तिकीट काउंटरवरून होणारा काळाबाजार उघड केला. यावेळी हर्षित दिनेश जोशी या 33 वर्षीय दलालास अटक केली.रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.यामुळे रेल्वे तिकिटाच्या काळाबाजाराचे मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news