Battery explosion : बॅटरीचा स्फोट होऊन ९ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी

Battery explosion : बॅटरीचा स्फोट होऊन ९ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरमध्ये ९ वर्षांचा बालक खेळत असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत हा बालक गंभीर जखमी झाला आहे.

नागपूर -छिंदवाडा रोडवरील सावनेर शहरातील रेल्वे क्वार्टर परिसरात राहणारा चिराग प्रविण पाटील (वय 9 वर्षे) हा मुलगा एका बॅटरीशी खेळत असताना बॅटरीचा स्फोट झाला. बॅटरीचा स्फोट इतका मोठा होता की चिरागच्या डाव्या गालावर गंभीर दुखापत झाली. रिमोटमध्ये लागणारे चायनाचे जास्त पॉवरचे हे सेल होते, ते सेल कोणत्यातरी वस्तुशी जोडण्याचा प्रयत्न करत असताना हे सेल गरम झाला. या बालकाने ते सेल गालाजवळ नेताच अचानक स्फोट झाला.

या घटनेनंतर त्याला नागपुरात आणण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सावनेर येथील प्राथमिक आरोग्य येथे सुरुवातीला चिरागला दाखल करण्यात आले असता डॉ. मयूर डोंगरे यांनी तपासून त्याला नागपूरला रेफर केले. सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोड यांच्या मदतीने मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथील ट्रामा सेंटरला त्याला दाखल करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news