नागपूर: मध्य रेल्वेच्या अजनी आरोग्य केंद्रात भीषण आग

नागपूर: मध्य रेल्वेच्या अजनी आरोग्य केंद्रात भीषण आग

Published on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: नागपूरच्या अजनी रेल्वे वसाहतीमध्ये असलेल्या मध्य रेल्वेच्या स्वास्थ्य केंद्राला आज (दि.२७) आग लागली. स्वास्थ्य केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीमधून आग दिसून आली. अग्निशमन दलाच्या ३ बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

केंद्रातील जुन्या लाकडी फर्निचरमुळे आगीने पेट घेतल्याने आग सर्वत्र पसरली. या आगीत महत्वाची कागदपत्रे, इतर साहित्य जळून खाक झाले. तर प्लास्टिक सिलिंग जळाले आहे. रविवार असल्यामुळे केंद्रात रूग्ण आले नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. एरवी मोठ्या संख्येने रुग्ण या ठिकाणी असतात. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news