गडकरी धमकी प्रकरण : एनआयएची विनंती कोर्टाने नाकारली, नागपुरातच तपास | Threat call to Gadkari

गडकरी धमकी प्रकरण : एनआयएची विनंती कोर्टाने नाकारली, नागपुरातच तपास | Threat call to Gadkari
Published on
Updated on
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खंडणी प्रकरणात जयेश पुजारी आणि अफसर पाशा या दोघांची चौकशी नागपूर ऐवजी मुंबईला स्थानांतरीत करण्यात यावी, अशी विनंती एनआयएने केली होती. ही विनंती नागपूर जिल्हा विशेष न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जयेश पुजारीने यापूर्वी देखील नागपूर ऐवजी बेळगावला आपल्याला नेण्यात यावे, जीवाला धोका असल्याची विनंती न्यायालयात केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळून लावली. उच्च न्यायालयात जावे असे या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने म्हटले आहे. बांगलादेशात प्रशिक्षण घेतलेला कुख्यात अफसर पाशा यापूर्वी दोनदा नागपुरात आला असल्याने त्याचे नागपूर कनेक्शन, स्लीपर सेल शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
१९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी असली तरी तपासादरम्यान पाशाचा पीसीआर वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. गरज पडल्यास पहिला आरोपी जयेश पुजारीला सुद्धा पुन्हा पीसीआरमध्ये घेऊन दोघांची एकत्र विचारपूस केली जाईल. या धमकी प्रकरणात दोघांचाही कटात सहभाग होता हे समोर आले आहे. नागपुरात काही लोकांशी पाशाचा सतत संपर्क होता यामुळे  तपासात आणखीही काही आरोपी पुढे येऊ शकतील अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. जम्मू काश्मीरमधील लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांशी  संबंधित अफसर पाशाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात बेळगाव येथून नागपूर पोलिसांनी प्रोडक्शन वारंटवर नागपुरात आणले आहे. अफसर पाशा हा चार दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. मुंबई एनआययेने केलेली मागणी  न्यायालयाने फेटाळून लावल्याने नागपुरातच धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत तपास केला जाणार आहे.  अनेक तपास यंत्रणा एकत्रितपणे हा तपास करीत असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news