

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : प्रॉपर्टीच्या वादात पतीने पत्नीचे डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना आज नागपुरातील बेल तरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत साकेत नगरात घडली.
शिवणगाव पुनर्वसन येथे तीन हजार चौरस फुटाचा एक भूखंड मृतक महिलेच्या नावावर होता. या भूखंडावरून पती-पत्नी सतत वादविवाद सुरू होते. दरम्यान,आज साकेत नगर येथील प्लॉटवर साफसफाई करून तो भूखंड आपल्या नावे करण्याचा प्रयत्नात ही महिला असल्याची कुणकुण लागताच आरोपी पतीने तिचा कायमचा काटा काढला. सुरुवातीला पतीने चाकूचे वार केले ती खाली पडताच तिच्या डोक्यात दगड घातला. शेजारच्या इसमाने बेलतरोडी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस पोहोचेपर्यंत ती महिला गतप्राण झाली होती. मृतक महिलेचे नाव सईजाबाई नागपुरे असे असून पती आरोपी बाबाराव नागपुरे यास पोलिसांनी घटनास्थळी अटक केली. बाबारावची ही दुसरी पत्नी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवघरे यांनी दिली. अधिक तपास सुरू आहे.