नागपूर : अंभोरा पर्यटनस्थळ विकासासाठी २०० कोटींचा प्रस्ताव : नितीन गडकरी

नागपूर : अंभोरा पर्यटनस्थळ विकासासाठी २०० कोटींचा प्रस्ताव : नितीन गडकरी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर- उमरेड मार्गावर असणाऱ्या अंभोरा प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी सिंचन विभागातर्फे २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. गोसीखुर्द बॅकवॉटरमध्ये कॅप्सूल लिफ्ट , हॉटेलिंग , क्रूज टुरिझम , जेट्टी प्रवास , जलपर्यटन  यासारख्या उपक्रमातून अंभोरा हे जागतिक दर्जाचे आकर्षण असणारे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल. किमान २ हजार तरुणांच्या हातांना काम मिळेल असा विश्वास प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूर उमरेड या राष्ट्रीय महामार्ग – ३५३ डी च्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमरेडचे आमदार राजू पारवे हेही उपस्थित होते.

नागपूर-उमरेड हा चौपदरीकरण झालेला रस्ता ४१ किलोमीटर लांब असून यासाठी ७८२ कोटी रुपये खर्च आलेला आहे. दरम्यान, नागपूर -उमरेड – वडसा – चंद्रपूर – गोंदिया या मार्गावरील ब्रॉडगेज मेट्रोच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून या कामाला सुद्धा काही महिन्यात प्रारंभ होईल.  १४० किलोमीटर प्रतितास  या ब्रॉडगेज मेट्रोचा वेग असून नागपूर ते उमरेड हे अंतर केवळ २५ मिनिटांत पार करणे शक्य होईल. मात्र, उमरेड ते नागपूर या चौपदरी रस्त्यावर रस्ता सुरक्षेच्या हेतूने सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक आहे, असेही गडकरी यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news