'उद्धव ठाकरेंकडून विनोद अग्रवाल यांना राज्यमंत्रीपदाची ऑफर होती'

माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांचा गौप्यस्फोट
Vinod Agarwal was offered the post of Minister of State by Uddhav Thackeray
'उद्धव ठाकरेंकडून विनोद अग्रवाल यांना राज्यमंत्रीपदाची ऑफर होती'File Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा

विनोद अग्रवाल हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना उध्दव ठाकरे यांच्याकडून राज्य मंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी सोमवार ( दि. ७) गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केला.

गेल्या २०१९ च्या निवडणुकीत गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टीतून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार, ६ ऑक्टोबर रोजी त्यांचे निलंबन रद्द केल्याचे जाहीर केले. या अनुषंगाने सोमवारी आमदार विनोद अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भाजपमध्येच असल्याचे जाहीर केले. यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित डॉ. फुके यांनीही पत्रकारांशी चर्चा केली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विनोद अग्रवाल हे विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांना अनेक पक्षांनी प्रलोभन, ऑफर दिली होती. यात विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याकडून अनिल देसाई आले होते. त्यांनी विनोद अग्रवाल यांना राज्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र, त्यावेळीही त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि सर्व काही प्रलोभने नाकारून राज्यातील भाजपसोबतच राहण्याचे समर्थन केले होते. त्यामुळे पक्षाने आज त्यांचे निलंबन मागे घेतले असल्याचे डॉ. फुके यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news