पीठ गिरणीतील अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

आटाचक्की पट्ट्यामध्ये सापडल्याने शीर धडापासून झाले वेगळे
Unfortunate death of woman in flour mill accident
दुर्दैवी अपघातात महिलेचा मृत्यूPudhari News

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : नवेगावबांध येथे पीठ गिरणीवर दळण दळत असताना महिलेची ओढणी पीठ गिरणीच्या पट्ट्यात अडकून अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात महिला गिरणीच्या पट्ट्यात अडकल्याने तिचे डोके शरीरापासून वेगळे झाले होते. हि अर्जुनी-मोरगाव तालुक्यामध्ये घडली आहे. नितू हर्षल उजवणे (वय.46) असे मृत महिलेचे नाव आहे.

नवेगावबांध येथील आझाद चौकात उजवणे कुटूंबाकडून पीठ गिरणीचा लघु व्यवसाय केले जातो. दरम्यान, नेहमीप्रमाणे ग्राहक आल्यानंतर नितूनीं पीठ गिरणी मशिन सुरू केली. गिरणीत दळण टाकत असताना अचानक त्यांची ओढणी मशिनच्या पट्ट्यात अडकली. यामध्ये नितूही ओढणीसोबतच मशिनच्या पट्ट्यात ओढल्या गेल्या. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Unfortunate death of woman in flour mill accident
Nashik Crime | अपघाती मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा

या घटनेमुळे उजवणे कुटूंबियावर दु:खाचे डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नवेगावबांध पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेचा अधिक तपास नवेगावबांध पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news