गोंदियात आमदार विनोद अग्रवाल करणार 'भाजप'मध्ये घरवापसी?

भाजपकडून निलंबन रद्द ; विधानसभा उमेदवारीची शक्यता
Gondia MLA Vinod Agarwal rejoining BJP
आमदार विनोद अग्रवाल
Published on
Updated on

गोंदिया : निवडणुकीच्या कालावधी जवळ येत असताना जिल्ह्यातील राजकारणही तापू लागले आहे. अनेक पक्षातील नेतेमंडळी खांदेपालट करण्यात व्यस्त आहेत. काही दिवसापुर्वी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात घरवापसी केली असताना आता गेल्या निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करून निवडणूक लढणारे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भाजपतर्फे निलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार अग्रवाल यांची भाजपमध्ये घरवापसी करून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढण्याची शक्यता बळावली आहे.

Gondia MLA Vinod Agarwal rejoining BJP
ठरलं तर ! पितृपंधरवडा संपताच भाजप नेते हर्षवर्धन पाटील घेणार मोठा निर्णय

गेल्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपतर्फे ऐन वेळेवर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये गणले जाणाऱ्या विनोद अग्रवाल यांना भाजपकडून डच्चू देण्यात आले होते. यावेळी विनोद अग्रवाल यांनी तिकीट न मिळाल्यामुळे भाजपशी बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवली होती. ज्यामध्ये विनोद अग्रवाल यांनी भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांचा जवळपास २७ हजार मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, पक्षाशी बंडखोरी करून निवडणूक लढविण्याच्या कारणावरून भारतीय जनता पार्टीतर्फे विनोद अग्रवाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. असे असताना गेली अडीच वर्षे आमदार विनोद अग्रवाल यांनी युती सरकारला समर्थन देत गोंदिया विधानसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे केली आहे. त्यातच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गेल्या महिन्यात भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये घरवापसी केली होती. अशातच आज ( दि. ६) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाकडून आमदार विनोद अग्रवाल यांच्यावरील निलंबन रद्द केला असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल हेदेखील आता भाजपमध्ये घरवापसी करून येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता बळावली आहे.

या सदस्यांचेही निलंबन रद्द

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विनोद अग्रवाल यांच्यासोबत १२ सदस्यांचे निलबंन मागे घेतले आहे. त्यामध्ये भाऊराव उके, छत्रपाल तुरकर, मुनेश रहागंडाले, शिव शर्मा, घनश्याम पानतवणे, अमित बुध्दे, रामराजे रवरे, धर्मेश अग्रवाल, दिपक बोबडे, नीतू बिरिया, शैलेष सोनवणे, कमलेश लिल्हारे यांचा समावेश आहे.

पत्रकार परिषदेतून घेणार निर्णय

आमदार विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द करण्यात आल्यानंतर ते कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. त्यातच उद्या ( दि. ७ ) पत्र परिषदेतून ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

Gondia MLA Vinod Agarwal rejoining BJP
भाजप निवडणूक जिंकल्‍यास मीच हरियाणाचा मुख्‍यमंत्री : अनिल विज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news