गोंदिया : पुढारी वृत्तसेवा: शिवशाही बस उलटून ११ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा गावाजवळ घडली. या घटनेत २९ प्रवासी गंभीर झाले. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये गोंदिया पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला असून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.
भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी (दि.२९) दुपारी भंडाराहून गोंदियाकडे येत होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा गावाजवळ बस उलटून जवळपास २० फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील ११ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. तर २९ प्रवासी जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डव्वा येथील गावकºयांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल होत मदत कायार्ला सुरुवात केली. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया-कोहमारा मार्गावर डव्वा जवळ झालेल्या अपघाताची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याकडून घेतली. तसेच प्रशासनाला त्वरित आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केली.
दुचाकीला ओव्हरटेक करताना भरधाव शिवशाही बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाले. बसचा वेग अधिक असल्याने ती रस्त्यावर जवळपास २० फूट घासत गेली. त्यामुळे काही प्रवासी बसखाली दबले होते, असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. तर घटनास्थळावर रक्ताचा सडा पडल्याचे चित्र होते.
स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- ३२ वर्ष, राहणार- अजुर्नी मोरगाव, जि.गोंदिया
मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
कल्पना रविशंकर वानखेडे, वय- ६५ वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
रामचंद्र कनोजे, वय- ६५ वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
आरिफा अजहर सय्यद, वय- ४२ वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
अजहर अली सय्यद, वय- ४५ वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
नयना विशाल मिटकर, वय- ३५ वर्ष, राहणार- बेसा, नागपूर
मृत्यू पावलेल्या २ प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही.
नैतिक प्रकाश चौधरी, वय- ८ वर्ष, राहणार- कामठी, जि.नागपूर
श्रीकृष्ण रामदास उके, वय- ४७ वर्ष, राहणार- कोसबी, जि.भंडारा
शारदा अशोक चव्हाण, वय- ६३ वर्ष, राहणार- नागपूर
पल्लवी प्रकाश चौधरी, वय- ३३ वर्ष, राहणार- कामठी, जि.नागपूर
लक्ष्मी धनराज भाजीपाले, वय-३३ वर्ष, राहणार- गोंदिया
स्वप्नील सुभाष हेमणे, वय- ४० वर्ष, राहणार- नागपूर
विद्या प्रमोद मडेकरी, वय-६३ वर्ष, राहणार- नागपूर
भार्गवी राजेश कडू, वय- १५ वर्ष, राहणार- नागपूर
धृविका स्वप्नील हेमणे, वय- ६ वर्ष, राहणार- नागपूर
टीना यशवंत दिघे, वय- १७ वर्ष, राहणार- सोमलपूर