महिला सरपंच ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

ग्राम रोजगार सेवकाकडून ५ हजारांची लाच घेताना कारवाई
Female sarpanch in ACB's net while taking bribe of 5 thousand
महिला सरपंच ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यातFile Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा

ग्राम रोजगार सेवकाकडून ५ हजार रुपयाची लाच घेताना महिला सरपंचाला गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा कारवाई करून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार १ ऑक्टोबर रोजी तिरोडा तालुक्यातील इंदुरा खुर्द येथे सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. सरिता सुनील तुमसरे (वय ३४) असे त्या महिला सरपंचाचे नाव आहे.

या विषयी मिळालेल्‍या अधिक माहितीनुसार, तक्रारदार हे ग्रामपंचायत इंदोरा खुर्द अंतर्गत रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, त्यांचा मार्च, एप्रिल, मे व जून २०२४ या चार महिन्यांच्या मानधनाचा ५३ हजार २०० रुपयांचा धनादेश ग्रामसेवक यांनी स्वःताची स्वाक्षरी करून तक्रारदार यांच्याकडे दिला. त्यावर सरपंच यांची स्वाक्षरी घेण्याचे सांगितले. यावर तक्रारदार हे सदर धनादेशावर स्वाक्षरी घेण्याकरीता सरपंच सरीता तुमसरे यांना भेटले असता त्यांनी धनादेशावर स्वाक्षरी करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली.

मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली होती. दरम्यान, पथकाने लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता, सरपंच सरीता तुमसरे यांनी तक्रारदारदाराच्या ५३ हजार २०० रुपयांच्या मानधनाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याकरीता ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावर पथकातर्फे मंगळवारी सापळा कारवाई करून सरपंच सरीता तुमसरे यांना पंचासमक्ष ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयित आरोपी महिला सरपंच तुमसरे यांच्या विरोधात तिरोडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पथक व तिरोडा पोलीस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news