भाजपचे कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद महासंमेलन रविवारी गोंदियात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते राहणार उपस्थित
BJP's Jan Ashirwad Mahasammelan in Gondia on Sunday
भाजपचे कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद महासंमेलन रविवारी गोंदियातFile Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा

आमदार विनोद अग्रवाल यांना सरकारकडून मिळालेल्या भरघोस निधीतून त्यांच्या सलग पाच वर्षे केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक टिबी टोली येथील मैदानात कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आमदार म्हणून आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत सरकारकडून मिळालेल्या विकास निधीच्या माध्यमातून गोंदिया विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कार्याबद्दल या कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह महायुतीतील नेतेमंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्‍याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा, तालुका व ग्रामीण शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news