गोंदिया : अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पाठलाग करून पकडला

देवरी पोलिसांची कारवाई ; वाहन चालक फरार, २१.२० लाखाचा मुद्देमाल जप्त
Gondia News
अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पाठलाग करून पकडलाPudhari News
Published on
Updated on

गोंदिया : गोवंशीय जनावरांना ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या ट्रकचा देवरी पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याची कारवाई आज, मंगळवार ( दि. ८) पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मुरदोली गावाजवळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ट्रकमध्ये कोंबलेले २६ जनावरांसह २१.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रक्रियेत चालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. 

देवरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार डांगे हे रात्री गस्तीवर असताना एपी २९ व्ही ९२१९ क्रमांकाचा ट्रक चिचगड मार्गे देवरी वरुन सुसाट वेगाने नागपूरच्या दिशेने जाताना दिसून आला. यावेळी त्यांनी ट्रक चालकाला ट्रक थांबविण्याचा इशारा केला. मात्र, सदर ट्रक चालकाने न थांबता भरधाव वेगात पसार झाला. पोलिस पथकाला सदर ट्रक व चालकावर संशय आल्याने पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला.

दरम्यान, महामार्गावरील देवरी तालुक्यातील मुरदोली गावाजवळ पोलिसांनी ट्रक थांबविले. यावेळी ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला. दरम्यान, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत चौकशी केली असता ट्रकमध्ये २६ गोवंशीय जनावरे चारापाण्याची सोय न करता निर्दयतेने कोंबल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून २६ जनावरे व ट्रकसह २१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविन डांगे यांच्यासह पोलिस नायक नागेश बोपचे, इंन्द्रवार पंधरे, अनिल ऊके, चालक पंकज पारधी यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news