गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील 'कचारगड' येथे दरवर्षी कोयापुनेम महोत्सवानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येत असून देशभरातील लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. यंदा 22 ते 26 फेब्रुवारीदरम्यान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा पाच दिवस लाखो भाविकांचा मेळा या गुहेत रंगणार आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी या यात्रेचा आढावा घेत संबंधित विभागाला नेमून दिलेली कामे सुव्यवस्थित करण्याचे निर्देश दिले.