Gadchiroli Boar Attack | तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर रानडुकराचा हल्ला

Boar Attacked Women | बेतकाठी आणि बिहिटेकला येथील घटना
Boar  Attacked Women in Gadchiroli forest
जखमी महिलेवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Boar Attacked Women in Gadchiroli forest

गडचिरोली : कोरची तालुक्यातील बेतकाठी आणि बिहिटेकला येथील तीन महिलांवर काल आणि आज रानडुकरांनी हल्ला केला. यातील दोन महिलांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर एका महिलेस कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. निराशा रवींद्र गुरवले (वय ३०), नंदकुमारी तेजराम बघवा (वय ४०) व उर्मिला संतोष मिरी (वय ४०) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

आज सकाळी काही महिला बेतकाठीच्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यातील निराशा गुरवले या महिलेवर रानडुकराने हल्ला केला. त्यात तिचे दोन्ही पाय आणि कमरेला दुखापत झाली. कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर तिला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.

Boar  Attacked Women in Gadchiroli forest
गडचिरोली जिल्ह्यातून १०० कोटींची रेती तस्करी: माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा दावा

७ मे रोजी बेतकाठी येथील नंदकुमारी बघवा हिच्यावरही रानडुकराने हल्ला केला. यावेळी तिच्या सोबत असलेला कुत्रा ओरडल्याने डुकर पळून गेला. तिला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याच दिवशी बिहीटेकला येथील उर्मिला मिरी हिच्यावरसुध्दा रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. तिच्यावर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बेळगावच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी जखमींना तातडीने आर्थिक मदत करण्याची कार्यवाही सुरू केली. तेंदूपत्ता कंत्राटदार आणि ग्रामसभेत झालेल्या समझोत्यानुसार तेंदूपत्ता संकलन करीत असताना एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाईकांना दीड लाख रुपये, तर जखमी झालेल्या मजुरांना ५० हजार रुपये औषधोपचाराचा खर्च देण्याचे ठरविले आहे, त्यानुसार मदत मिळावी, अशी मागणी मजुरांकडून केली जात आहे.

Boar  Attacked Women in Gadchiroli forest
गडचिरोली : मोटारसायकल अपघातात तीन युवक जागीच ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news