सिरोंचा तालुक्यात अवकाळी पाऊस; मिरची, कापूस पिकाला फटका

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Gadchiroli News |
अवकाळी पाऊस पडल्याने मिरची व कापूस या नगदी पिकांना जबर फटका बसला आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

गडचिरोली : शुक्रवारी (दि.२१) रात्री सिरोंचा तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने मिरची व कापूस या नगदी पिकांना जबर फटका बसला असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सिरोंचा तालुका हा गडचिरोली जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. या तालुक्यात धानपिकाबरोबरच मिरची व कापूस या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यंदा शेतकऱ्यांनी जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रात मिरचीची, तर दीड हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती. बहुतांश शेतक-यांची तोडाई आटोपली. परंतु बाजारपेठेत मिरची व कापसाला दर कमी असल्याने अनेक शेतक-यांनी योग्य दर मिळेल, याची वाट बघत उत्पादित माल विकलाच नाही. शेतक-यांनी तोडलेली मिरची वाळविण्यासाठी शेतात ठेवली होती. कापूसही साठवणूक करुन ठेवला होता. मात्र, शुक्रवारी संध्याकाळनंतर वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील वाळलेली मिरची आणि कापूस भिजले. परिणामी शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी मिरची व कापूस उत्पादक शेतक-यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news