चकमकीत तीन नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

४ फेब्रुवारीला दिवसा झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, एक जवान शहीद
Published on
Updated on

गडचिरोली: छत्तीसगड राज्य व भामरागड तालुक्यातील सीमावर्ती भाग असलेल्या फोदेवाडा गावानजीकच्या जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चकमकीत आतापर्यंत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत दीपक मडावी नामक जवान शहीद झाला असून, जोगा मडावी हा जवान जखमी झाला आहे.

३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कंपनी क्रमांक १० चे नक्षलवादी आणि छत्तीसगडमधील काही नक्षली फोदेवाडा परिसरातील जंगलात एकत्र आल्याचे कळताच भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली. ४ फेब्रुवारीला दिवसा झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले.

त्यानंतर ५ फेब्रुवारीला सकाळपासून पुन्हा सी-६० पथक, केंद्रीय राखीव दल व जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास प्रारंभ केला. यावेळी नक्षल्यांशी तुंबळ चकमक उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन एका नक्षल्याचा मृतदेह ताब्यात घेतला होता. पुन्हा दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. यात दोन पुरुष व एका महिला नक्षलीचा समावेश आहे. पोलिसांनी एक एके ४७ व एक एसएलआर रायफल जप्त केली आहे. मृत नक्षल्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

या चकमकीत गंभीर जखमी झालेला सी-६० पथकाचा जवान दीपक चिन्ना मडावी(३८) मूळ गाव मांड्रा(दामरंचा),ता.अहेरी यास आज पहाटे हेलिकॉप्टरने भामरागड येथे आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. जोगा मडावी,रा.किष्टय्यापल्ली हा जवान गोळी लागल्याने जखमी झाला. त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहीद जवानाच्या पार्थिवाला आज दुपारनंतर गडचिरोली येथे मानवंदना देण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news