Gadchiroli Boar Attack | रानडुकराच्या हल्ल्यात तीन जण जखमी, महिलेला गंभीर दुखापत

कोरची तालुक्यातील बोडेना गावालगतच्या जंगलात घटना
Wild Boar Attack  Woman Injured
Wild Boar Attack Woman InjuredPudhari
Published on
Updated on

Wild Boar Attack Woman Injured

गडचिरोली : तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.९) सकाळी ८ वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बोडेना गावालगतच्या जंगलात घडली. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून, त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

पुष्पा कालिदास भैसारे(४५), रा.कोरची, नंदकिशोर किशनलाल बोरकर (५४), रा.भीमपूर व कृष्णा बुधराम पडोटी (६१), रा.कोरची अशी जखमींची नावे आहेत.

सध्या तेंदूपाने तोडण्याचा हंगाम असल्याने कोरची व बोडेना परिसरातील नागरिक गावालगतच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यास गेले होते. एवढ्यात अचानक एका रानडुकराने मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात पुष्पा भैसारे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. तसेच नंदकिशोर बोरकर यांचा डावा हात, मांडी व पोटाला इजा झाली, तर कृष्णा पडोटी यांच्या उजव्या पायाच्या मांडीचा डुकराने चावा घेतला.

Wild Boar Attack  Woman Injured
Gadchiroli News | नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणे लग्नात वाजवले; ५ आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ जखमींना कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.आशिष इटनकर यांनी उपचार केले. मात्र, पुष्पा भैसारे यांच्या छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.

सध्या ग्रामीण भागात तेंदूपत्ता हंगाम सुरू झाल्याने, नागरिक दररोज जंगलात जाऊन तेंदूपत्ता संकलन करीतत आहेत. अशा परिस्थितीत रानडुकर व अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढला आहे.

Wild Boar Attack  Woman Injured
Gadchiroli News | रस्ते आणि पुलाचे काम अपूर्ण: जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली राष्ट्रीय महामार्ग विभागाला कारणे दाखवा’ नोटीस

त्यामुळे जंगलात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात तसेच जखमींना तातडीने आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news