गडचिरोलीत कंत्राटी भरती विरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा

Gadchiroli Teachers Protest | सामूहिक किरकोळ रजा आंदोलन
Gadchiroli Teachers  Protest
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर कंत्राटी भरती विरोधात शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढला.Pudhari Photo
Published on
Updated on

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय तत्काळ रद्द करावा, या आणि अन्य मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी आज (दि.२५) सामूहिक किरकोळ रजा आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला. शासनविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आ.सुधाकर अडबाले आणि शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकरी शिक्षकांना संबोधित केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

२० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असून तो तत्काळ रद्द करावा, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती रद्द करावी, शिक्षण सेवक योजना बंद करुन पूर्ण वेतनावर शिक्षकांची नियुक्ती करावी, विद्यार्थ्यांना विनाविलंब मोफत गणवेश देण्यात यावे. इत्यादी मागण्या शिक्षकांनी केल्या.

या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख संघटना, कास्ट्राईब कल्याण महासंघ, शिक्षक भारती, विषय शिक्ष संघटना, आदर्श शिक्षक समिती इत्यादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Gadchiroli Teachers  Protest
गडचिरोली : दुचाकींची समोरासमोर धडक; एका मृत्यू, दोघे गंभीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news