

गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणा राज्याच्या हद्दीतील गोदावरी नदीत अंघोळीसाठी उतरलेली सहा मुले बुडाल्याची घटना शनिवार, 7 जून रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.
सर्व मुले तेलंगणाची असून, त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. पत्ती मधुसूदन (वय 15), पत्ती मनोज (13), कर्नाळा सागर (14), तोगरी रक्षित, पांडू (18) व राहुल अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागातून गोदावरी नदी वाहते. या नदीच्या पलीकडे तेलंगणा सरकारने मेडीगड्डा धरण बांधले आहे. या धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीत अंघोळीसाठी सहा मुले गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण बुडाली. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.