Gadchiroli News | गडचिरोली उबाठा शिवसनेत मोठे फेरबदल, विद्यमान जिल्हाप्रमुखांची गच्छंती, पवन गेडाम नवे जिल्हाप्रमुख!

डॉ.श्रीकांत बन्सोड सहसंपर्कप्रमुख, तर दिलीप सुरपाम अहेरीचे जिल्हाप्रमुख
Gadchiroli News
नवे जिल्हाप्रमुख! पवन गेडाम, डॉ.श्रीकांत बन्सोड, दिलीप सुरपाम
Published on
Updated on

गडचिरोली : जिल्ह्यातील शिवसैनिकांनी (ठाकरे गट) तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्ह्यातील पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. सध्याचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांची गच्छंती करण्यात आली असून, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांची शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

गुरुवारी(ता.११) मुंबई येथे माजी खासदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसचिव विनायक राऊत यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी विद्यमान जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या कार्यप्रणालीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांनीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुढे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जारी केल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. घोषणा होताच नव्या शिवसैनिकांनी आज संध्याकाळी शिवसेना जिल्हा कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

घोषणेनुसार गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रांचे जिल्हाप्रमुख म्हणून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली, तर अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख म्हणून विद्यमान उपजिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम यांना संधी देण्यात आली. डॉ.श्रीकांत बन्सोड यांना जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख बनविण्यात आले आहे. डॉ.बन्सोड यांनी यापूर्वी शिवसेनेत महत्वाची पदे भूषवली आहेत.

माजी जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ निराशाजनक

माजी जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके हे मागील चार वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. परंतु या कालावधीत झालेल्या लोकसभा, विधानसभा व नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने अतिशय सुमार कामगिरी केली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी पक्षनेतृत्वापुढे वारंवार नाराजीचा पाढा वाचला. अशातच माजी जिल्हाप्रमुख व दबंग नेते म्हणून ओळख असलेले सुरेंद्रसिंह चंदेल हे आपल्या समर्थकांसह शिंदे सेनेत गेल्याने शिवसेनेत प्रचंड मरगळ आली होती. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने पक्षात जाण ओतण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news