Gadchiroli Adivasi Sahitya | गडचिरोलीत शनिवारपासून आदिवासी साहित्यावर चर्चासत्र: साहित्य अकादमी व दंडकारण्य संस्थेचा उपक्रम

महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य या विषयावर चर्चासत्र
 Marathi Sahitya Sammelan
Sahitya SammelanFile Photo
Published on
Updated on

Tribal literature seminar Gadchiroli

गडचिरोली : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने साहित्य अकादमी आणि दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे २८ व २९ मार्च असे दोन दिवस महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

चामोर्शी मार्गावरील व्ही.एस.सेलीब्रेशन हॉल येथे होणाऱ्या या चर्चासत्राचे उद्घाटन शनिवारी (दि.२८) सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध लेखक व संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते होणार असून, साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील अध्यक्षस्थानी राहतील. अकादमीचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर हे स्वागतपर भाषण करतील. मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख विनोद कुमरे हे बीजभाषण करणार असून, साहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेचे सदस्य डॉ.प्रमोद मुनघाटे प्रास्ताविक करतील. प्रमुख अतिथी म्हणून दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजाभाऊ मुनघाटे उपस्थित राहणार आहेत.

 Marathi Sahitya Sammelan
Gadchiroli Surrendered Naxals | नसबंदी खुली: १४ आत्मसमर्पित नक्षल्यांना मिळणार सांसारिक सुखाची संजीवनी

यानंतर होणाऱ्या 'आदिम संस्कृती आणि समकालीन आदिवासी साहित्य' या विषयावरील पहिल्या सत्राच्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक वाहरु सोनवणे हे राहतील, तर दशरथ मडावी व गोविंद गायकी विचार मांडतील. 'प्रस्थापिक मराठी साहित्य आणि आदिवासी जीवन वास्तव' या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे हे राहतील, तर अनिल साबळे व प्रभू राजगडकर आपले विचार व्यक्त करतील. त्यानंतरच्या 'आदिवासी लोकसाहित्य संशोधन आणि संपादनाच्या दिशा' या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी गावीत राहतील, तर श्रीकृष्ण काकडे व काशिनाथ बऱ्हाटे विचार मांडतील.

दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता 'आदिवासी स्त्री: वास्तव आणि साहित्य' या विषयावर परिसंवाद होईल. कवयित्री उषाकिरण आत्राम अध्यक्षस्थानी राहतील, तर पुष्पा गावीत व कुसुम आलाम विचार व्यक्त करतील. त्यानंतर 'मराठी रंगभूमीवरील आदिवासी जीवन आणि संघर्ष' या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी नाट्यलेखक चुडाराम बल्हारपुरे हे राहतील, तर अनिरुद्ध वनकर व राजकुमार मुसणे विचार मांडतील. दुपारी अडीच वाजता समारोपीय सत्र होणार असून, साहित्यिक डॉ.विनायक तुमराम समारोपीय भाषण करतील. प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे अध्यक्षस्थानी राहणार आहे. कार्यक्रमस्थळी साहित्य अकादमीच्या वतीने पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news