Gadchiroli News | सर्पदंश प्रकरणी आदिवासी प्रकल्प कार्यालयातील दोन अधिकारी निलंबित!

आश्रमशाळेतील गंभीर त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका
Gadchiroli News | आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: नागपुरात भरती समृद्धी नैताम अजूनही व्हेंटिलेटरवरच!
Gadchiroli News | आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: नागपुरात भरती समृद्धी नैताम अजूनही व्हेंटिलेटरवरच!
Published on
Updated on

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधा, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबतच्या गंभीर त्रुटींच्या तपासणीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी आदिवासी विकास विभागाने दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. कन्नाके आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पी. पी. सादमवार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

नागपूरच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास आयुषी सिंह यांनी २१ ऑगस्ट रोजी निलंबनाचे आदेश जारी केले. आश्रमशाळेच्या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद न साधणे, मूलभूत त्रुटींची योग्य नोंद न करणे आणि त्या दूर करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा न करणे, असे ठपके अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आले आहेत.

Gadchiroli News | आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: नागपुरात भरती समृद्धी नैताम अजूनही व्हेंटिलेटरवरच!
Illegal Sand Mining Gadchiroli | अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडल अधिकारी, तलाठी निलंबित ; तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे

तपासणीत शाळेतील शौचालये व स्नानगृहे अस्वच्छ आणि अपुरी असल्याचे, प्राथमिक उपचार पेटी उपलब्ध नसल्याचे तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे आढळले. बोअरवेलचे पाणी योग्य शुद्धीकरणाशिवाय वापरले जात असल्याचेही निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना पलंग उपलब्ध नसून गाद्या फाटलेल्या अवस्थेत असल्याचे आदेशात नमूद आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांचे खुलासे अमान्य केल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली. जपतलाई प्रकरणानंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news