Gadchiroli Accident News | रक्षाबंधनासाठी जाताना काळाचा घाला! ट्रॉलीला दुचाकीची धडक: ८ वर्षांचा मुलगा ठार; आई-वडील जखमी

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील घटना
bike-trolley collision
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील अपघातग्रस्त ट्रॉली Pudhari Photo
Published on
Updated on

Sironcha  bike trolley collision  child killed

गडचिरोली: रक्षाबंधनासाठी सिरोंचाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने मोटारसायकलवरील ८ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर वडील आणि आई जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना आज (दि.९) सकाळी सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे घडली.

शौर्य संतोष कोकू (वय ८) असे मृत बालकाचे नाव असून, संतोष रामलू कोकू (वय ४३) व सौंदर्या संतोष कोकू (वय ३६) अशी जखमींची नावे आहेत. असरअली येथील संतोष कोकू हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सिरोंचा येथे रक्षाबंधनासाठी जात होते. अंकिसा येथे पोहचताच गावात रामकृष्ण चिरला यांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. परंतु रस्ता अरुंद असल्याने संतोष कोकू यांचे नियंत्रण सुटून मोटारसायकल ट्रॉलीला धडकली. यात शौर्यचा जागीच मृत्यू झाला.

bike-trolley collision
Armori Gadchiroli Highway Accident | आरमोरी-गडचिरोली महामार्गावर भीषण अपघात; काटली येथील मृत तरुणाच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

संतोष कोकू यांचा डावा हात आणि पाय मोडला, तर सौंदर्या कोकू किरकोळ जखमी झाल्या. संतोष कोकू यांच्यावर सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना तेलंगणातील वारंगळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे असरअली व सिरोंचात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news