गडचिरोली: लांजेडा येथे भीषण अपघातात निवृत्त अभियंता ठार

वाहनाची स्कुटीला समोरून जोराची धडक
Gadchiroli accident retired  engineer dies
निवृत्त अभियंता साईनाथ दुम्पेट्टीवार यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला.Pudhari News Network
Published on
Updated on

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील लांजेडा वॉर्डातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी ( दि. ४) रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने जलसंधारण विभागाचे निवृत्त उपविभागीय अभियंता साईनाथ दुम्पेट्टीवार (वय ५९) जागीच ठार झाले. (Gadchiroli News)

साईनाथ दुम्पेट्टीवार हे गडचिरोली येथील कॅम्प एरिया परिसरात वास्तव्य करीत होते. रात्री १० च्या सुमारास ते स्कुटीने लांझेडा येथून घराकडे परतत असताना गडचिरोलीहून इंदिरानगरच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच ३३ एसी ४५३३) वाहनाने त्यांच्या स्कुटीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुम्पेट्टीवार यांना वाहनाने ७० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. (Gadchiroli News)

घटनेनंतर वाहनचालक आणि वाहनातील अन्य व्यक्ती फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगडजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार भास्कर सेलोटे पुढील तपास करत आहेत.

मृत साईनाथ दुम्पट्टीवार हे जिल्हा परिषदेच्या जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता पदावरुन २०२३ मध्ये सेवानिृत्त झाले होते. राज्य शासनाने त्यांचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gadchiroli accident retired  engineer dies
गडचिरोली जिल्ह्यातील ४ शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news