Gadchiroli Mining Protest | पुसेर पहाडीवर लोहखाण होऊ देणार नाही: ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा ग्रामपंचायतींतर्गत पुसेर पहाडी परिसरातील खाण प्रकल्पावा नागरिकांचा तीव्र विरोध
Puser Pahadi Mining Project Protest
Puser Pahadi Mining Project ProtestPudhari
Published on
Updated on

Chamorshi Puser Pahadi Mining Project Protest

गडचिरोली : जिल्ह्यात जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेले असताना आता चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा ग्रामपंचायतींतर्गत पुसेर पहाडी परिसरातील प्रस्तावित खाण प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत सरकार आणि खासगी कंपन्यांना लोहखाणीसाठी पहाडी देणार नाही, असा इशारा दिला आहे.

२३ मे २०२६ रोजी ग्रामस्थांनी सभा आयोजित करुन तीव्र रोष व्यक्त केला. या सभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, इलाका समितीचे अध्यक्ष केसरी मट्टामी, जिल्हा ग्रामसभा अध्यक्ष नितीन पदा, प्रमोद कोसेकर, सरपंच माधुरी आतला, देवापूरचे सरपंच शिवाजी गावडे, इलाका अध्यक्ष मारोती हिचामी, जमीनदार अशोक रायसिडाम, आदिवासी मित्र पुंडलिक भांडेकर, इलाका सदस्या रंजना पांडे, साधना केळझरकर, रामू हेडो, देवराव हिचामी, गणू नरोटे यांच्यासह इलाक्यातील २२ ग्रामसभांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Puser Pahadi Mining Project Protest
Gadchiroli iron mine protest | पुसेर पहाडीवर लोहखाण होऊ देणार नाही: ग्रामस्थांचा इशारा

गडचिरोली शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेले पावीमुरांडा व त्याअंतर्गत येणारे पुसेर गाव हे निसर्गसंपन्न आणि जंगलावर आधारित पारंपरिक जीवनशैली जपणारे क्षेत्र आहे. येथील स्थानिक आदिवासी व ग्रामीण जनता तेंदूपत्ता, बांबू, अन्य वनोपज व शेतीवर आधारित उपजीविका करत असून शांततेत जीवन जगत आहे. मात्र  विकास व रोजगाराच्या नावाखाली सरकार व काही खासगी कंपन्या या परिसरातील ग्रामसभांची परवानगी न घेता पहाड्यांवर उत्खनन प्रकल्प राबविण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

तसेच जंगल, जमीन व जलस्रोतांच्या संरक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी समाज, लोकशाहीवादी पक्ष-संघटना आणि पर्यावरणप्रेमींनी या संघर्षात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

Puser Pahadi Mining Project Protest
Gadchiroli Naxal : बिनागुंडाच्या जंगलातील माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

नफा कमावण्यासाठी कायदे, पर्यावरण, आदिवासींचे हक्क व शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा विचार न करता प्रकल्प राबविले जात आहेत. सरकार हे जनतेच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी मध्यस्थ किंवा दलालाची भूमिका पार पाडत आहे, असा आरोप माकप नेते कॉ.अमोल मारकवार यांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news