Gadchiroli Liquor Smuggling: गडचिरोलीत दारुतस्करांनी लढवली नवी शक्कल,12 लाखांच्या 'थार' कारमधून तस्करी

एटापल्ली पोलिसांची कारवाई: १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Illegal Liquor Seizure Gadchiroli
Illegal Liquor Seizure GadchiroliPudhari
Published on
Updated on

Illegal Liquor Seizure Gadchiroli

गडचिरोली : दारु तस्करांनी महागड्या वाहनांमधून दारुची अवैध वाहतूक करण्याची नवी शक्कल लढवली आहे. एटापल्ली पोलिसांनी रविवारी (दि.१९) केलेल्या कारवाईत ३ लाख रुपयांची दारु आणि 'थार' ही महागडी कार असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी मयूर विजय बालमवार ( रा.वॉर्ड क्रमांक ७, गडचिरोली) यास अटक केली आहे.

साधारणत: महागड्या वाहनांमधून उच्चभ्रू लोक प्रवास करतात. त्यामुळे कुणाला संशयही येत नाही. हीच बाब हेरुन दारु तस्कर अशा वाहनांचा वापर करायला लागले आहेत. रविवारी एटापल्ली तालुक्यात एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर दारुची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने पाळत ठेवली.

Illegal Liquor Seizure Gadchiroli
Gadchiroli Police | पोलिस दलाच्या रोजगार मेळाव्यात १२७८ युवकांना नियुक्तीपत्र प्रदान

एवढ्यात एमएच ३२-ए.एस. ७०९९ क्रमांकाची थार ही कार नारानूर-ताडपल्लीमार्गे लांझी गावात येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता त्यात देशी दारुच्या २९ पेट्या आणि बिअरची एक पेटी असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांची दारु आढळून आली.

पोलिसांनी ही दारु आणि १२ लाख रुपये किमतीची थार ही कार असा एकूण १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी मयूर विजय बालमवार यास अटक केली. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Illegal Liquor Seizure Gadchiroli
Gadchiroli News | खताची साठेबाजी करणाऱ्या १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, कार्तिक मधिरा, गोकुल राज जी, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news