Gadchiroli Naxal Memorials | गडचिरोली पो‍लिसांनी एकाच दिवशी उद्ध्वस्त केली नक्षल्यांची ४४ स्मारके

पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जांभिया) परिसरातील स्मारके उद्ध्वस्त
Gadchiroli  Naxalite Smarak demolition
जंगलात नक्षल्यांनी उभारलेली ४४ स्मारके पोलिसांनी एकाच दिवशी उद्ध्वस्त केली.Pudhari
Published on
Updated on

Gadchiroli Naxalite Smarak demolition

गडचिरोली : शहीद सप्ताह व अन्य वेळी दुर्गम भागातील जंगलात नक्षल्यांनी उभारलेली ४४ स्मारके पोलिसांनी बुधवारी (दि.१८) एकाच दिवशी उद्ध्वस्त केली. यामुळे त्या भागातील नागरिकांमध्ये असलेली भीती कमी होण्यास मदत होणार आहे.

दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या सप्ताहात ते मृत नक्षल्यांची स्मारके उभारुन त्यांना श्रद्धांजली वाहतात. दुर्गम भागात अजूनही अनेक ठिकाणी ही स्मारके असल्याने नागरिकांना भीती वाटत असते. ही भीती काढून घेण्यासाठी पोलिस नक्षल्यांची स्मारके उद्ध्वस्त करीत असतात. परंतु पोलिसांचे सी-६० पथके, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि जिल्हा पोलिसांच्या १८ पथकातील ८०० जवानांनी विशेष अभियान राबवून आज वेगवेगळ्या भागातील जंगलात उभारलेली ४४ स्मारके एकाच दिवशी पोलिसांनी नष्ट केली.

Gadchiroli  Naxalite Smarak demolition
Gadchiroli News | गडचिरोलीत ‘नीव’ प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासन आणि 'प्रधान' संस्थेत सामंजस्य करार

यात एटापल्ली उपविभागीतल १८, हेडरी उपविभागातील १७, भामरागड उपविभागातील ७, जिमलगट्टा उपविभागातील २ आणि धानोरा व पेंढरी उपविभागातील प्रत्येकी एका स्मारकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नक्षल्यांचे आश्रयस्थान असलेल्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा(जांभिया) परिसरातील ही स्मारके उद्ध्वस्त केल्याने आता सामान्य नागरिकांच्या मनात असलेली भीती नष्ट झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी, पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Gadchiroli  Naxalite Smarak demolition
Gadchiroli Court News | १५ वर्षांपासून प्रलंबित बलात्काराच्या खटल्यातील कुरखेडा येथील आरोपीची निर्दोष मुक्तता

पोलिस अधीक्षक गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळ जवळपास संपली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस दल प्रयत्नशिल आहे. पोलिस खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी उभे राहील

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news