Gadchiroli Police |गडचिरोली पोलिस दलातील ३१ अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक जाहीर!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घोषणा
Maharashtra Police
Maharashtra PolicePudhari News Network
Published on
Updated on

गडचिरोली : नक्षल्यांविरोधात शौर्याने लढणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील ३१ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक जाहीर झालेल्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर नैताम, उपनिरीक्षक वासुदेव मडावी, सहायक फौजदार विलास पोरतेट,हवालदार सर्वश्री संतोष नैताम,विश्वनाथ सडमेक, ज्ञानेश्वर तोरे, दिलीप सडमेक, रामसू नरोटे, आनंदराव उसेंडी, राजू चव्हाण, मोहन उसेंडी, संदीप वसाके,पोलिस नाईक सर्वश्री अरुण मेश्राम, सुधाकर वेलादी, नीतेश वेलादी, विश्वनाथ मडावी, कैलास कोवासे, हरिदास कुलयेटी, किशोर तलांडे,अतुल मडावी, अनिल आलाम, नरेंद्र मडावी, आकाश उईके, घिस्सू आत्राम, राजू पुसाली, महेश जाकेवार, रुपेश कोडापे, मुकेश सडमेक,योगेंद्रराव सडमेक, कारे आत्राम यांचा समावेश आहे.

४० नक्षल्यांना घातले होते कंठस्नान

२२ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील बोरिया-कसनासूर परिसरात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत उपरोक्त ३१ पोलिस अधिकारी व जवानांनी ४० नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक जाहीर झाले

३९४ अंमलदारांना पदोन्नती

आज गडचिरोली पोलिस दलातील ३९४ पोलिस अंमलदारांना पदोन्नतीl बहाल करण्यात आली असून, त्यात १० अंमलदारांना वेगवर्धित पदोन्नती तर १४ शहीद अंमलदारांचाही समावेश आहे. त्यापैकी ८२ हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. ९ पोलिस हवालदारांना वेगवर्धित पद्धतीने पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच एकूण ३०२ पोलिस नाईक यांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती मिळाली असून एका पोलिस नाईकास वेगवर्धित पदोन्नती मिळाली आहे. यासोबतच ७ शहीद पोलिस हवालदारांना सहायक पोलिस उप-निरीक्षकपदी व ७ शहीद पोलिस नाईक यांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

वरिष्ठांनी केले अभिनंदन

राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच पदोन्नतीप्राप्त पोलिस अंमलदार यांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षकएम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा व अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी. यांनी अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news