Gadchiroli News : गिझर दुरुस्त करताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

gadchiroli accident
Published on
Updated on

गडचिरोली : गिझर दुरुस्त करीत असताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी चामोर्शी मार्गावरील एका वस्तीत घडली. अमित भोपये(३२) मु,पो.मुरमाडी,ता.गडचिरोली असे मृत युवकाचे नाव आहे.

सेवानिवृत्त अधिकारी प्रदीप इंदूरकर हे चामोर्शी मार्गावरील आशीर्वाद नगरात राहतात. घरचा गिझर बंद असल्याने तो दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अमित भोपये यांना बोलावले. अमित पोहचला तेव्हा शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच स्थितीत त्याने गिझर दुरुस्तीचे काम सुरु केले. मात्र, दुरुस्ती करीत असताना अचानक वीजपुरवठा सुरु झाला आणि अमितला जोरदार धक्का बसला. तो खाली कोसळला. त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रिस्क नका घेऊ

विजेची उपकरणे दुरुस्त करताना अनेकदा इलेक्ट्रिशियन्सना अतिआत्मविश्वास नडल्याच्या घटना घडल्या आहेत. उपकरणे दुरुस्त करताना वीजपुरवठा खंडित करणे, विद्युत रोधक साधनांचा वापर करणे अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news